Bhusawal Honda Showroom | भुसावळमध्ये होंडा शोरूमविरोधात संताप; सदोष ॲक्टिव्हा प्रकरणी ७ दिवसांचा अल्टिमेटम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bhusawal Honda Showroom| मिलिंद जंजाळे | भुसावळ येथील जुना जळगाव रोडवरील होंडा अधिकृत शोरूमविरोधात ग्राहक फसवणुकीचा आरोप समोर आला आहे. नव्याने खरेदी केलेल्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा दावा करत रिपब्लिकन सेनेकडून शोरूम व्यवस्थापनाला निवेदन देण्यात आले असून ७ दिवसांत समाधानकारक तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisement -

रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते श्री. सुमित अशोक निकम यांनी ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सदर शोरूममधून नवीन ‘होंडा ॲक्टिव्हा’ खरेदी केली होती. तक्रारीनुसार, अवघ्या आठ दिवसांतच गाडीच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाला. याबाबत शोरूममध्ये तक्रार नोंदवली असता, मेकॅनिकल मॅनेजर विकास शिंदे यांनी दुरुस्तीसाठी १५ दिवसांचा कालावधी मागितल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गाडी भररस्त्यात बंद पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज शोरूम व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

निवेदनात पुढील मुद्दे मांडण्यात आले आहेत:

  • उत्पादनात दोष असताना गाडी बदलून न देणे कायद्याविरुद्ध असल्याचा दावा

  • ग्राहक फसवणुकीबाबत कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा इशारा

  • सदोष वाहने विक्रीबाबत आरटीओकडे ट्रेड सर्टिफिकेट रद्द करण्यासाठी पाठपुरावा

रिपब्लिकन सेनेकडून स्पष्ट करण्यात आले की, ७ दिवसांत श्री. सुमित निकम यांना नवीन गाडी व लेखी माफीनामा न दिल्यास शोरूमसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा नेते दिनेश इखारे, सामाजिक कार्यकर्ते बंटी नरवाडे, जिल्हाध्यक्षा सौ. वंदनाताई सोनवणे, सौ. वंदनाताई आराक, श्री. देवदत्त मकासरे (मेजर) व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

इन्स्टाग्रामवरील प्रेम ठरलं जीवघेणं; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, चोपडा तालुका हादरला
तलाठी कार्यालयात आमने-सामने! शाब्दिक वादाचा व्हिडिओ रेकॉर्ड, प्रकरण पोलीस ठाण्यात
“लाच प्रकरणानंतर 24 तासातच जळगावात वाळू माफियांचा कहर! 57 वर्षीय नागरिकाचा डंपरखाली

Bhusawal Honda Showroom

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

ST Bus Accident | यावलजवळ एसटी–इको भीषण अपघात; १०...

ST Bus Accident | यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील यावल-टाकरखेडा मार्गावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास एसटी बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या इको कारमध्ये भीषण...

Dharmarath Foundation | शिवाजीनगरमध्ये ‘ऑर्थोपेडिक लायब्ररी’चा शुभारंभ; गरजू रुग्णांना...

Dharmarath Foundation | साक्षीदार न्यूज | आजारातून बरे होताना किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना अनेकदा महागड्या वैद्यकीय साहित्याची गरज भासते. हीच गरज ओळखून धर्मरथ फाउंडेशन यांच्या संयुक्त...

Jalgaon ZP Health Department | जळगाव जि.प. आरोग्य विभागाच्या...

Jalgaon ZP Health Department | सुनिल भोळे | जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार म्हणजे 'आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी अवस्था झाली आहे....

RECENT NEWS