Bhusawal Pune Travels Accident साक्षीदार न्युज | दि. २ जून २०२५ | भुसावळहून पुण्याकडे जाणारी एक खासगी ट्रॅव्हल्स बस जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ रविवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास उलटल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती दडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बस (क्रमांक: MH.19.CY.2224) भुसावळहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. गारखेडा परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. प्रत्यक्षदर्शींनुसार, अपघातात अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.
दरम्यान, जामनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. कासार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या अपघाताबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगितले. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी हा अपघात किरकोळ असून कोणालाही दुखापत झाली नसल्याचा दावा केला. परंतु, प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांकडून या घटनेची तीव्रता कमी दाखवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.
या अपघातामुळे रस्त्यावरील कामाच्या सुरक्षिततेवर आणि वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती आणि तपासाच्या प्रगतीबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
धक्कादायक : राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पादचाऱ्याला उडविले !
शिक्षणाच्या माहेरघराजवळ जुगाराचा अड्डा! पोलीस आणि राजकारण्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
जळगाव ग्रंथालय पुस्तक खरेदी घोटाळा ? : चौकशी समितीच्या भेटी सुरू : आज शहरात होणार तपासणी
बँकेत कोट्यवधींचा अपहार, गोर-गरीबांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू
शिरपूर मर्चंट बँक घोटाळा: १३ कोटींची फसवणूक, ४९ जणांवर गुन्हा – तुमचे पैसे सुरक्षित आहेत का ?
msrlm umed अनिल बडगुजर यांची आत्महत्या । भाग २