Bhusawal Runners | फक्त १५ तासांत १०० कि.मी. अल्ट्रा मॅरेथॉन! भुसावळच्या डॉ. तुषार पाटील आणि विजय फिरके यांचा दमदार ‘रणवीर’ पराक्रम

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bhusawal Runners | भुसावळ | धावण्याच्या क्षेत्रात मोठे यश संपादन करत, भुसावळच्या दोन धावपटूंनी नुकत्याच पार पडलेल्या खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये (Khadakwasla Ultra Marathon) अतुलनीय पराक्रम केला आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तुषार पाटील (जे स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही सहभागी झाले होते) आणि त्यांच्यासोबतचे विजय फिरके (ताप्ती रनिंग ग्रुप) यांनी १०० किलोमीटरची अत्यंत खडतर अल्ट्रा मॅरेथॉन केवळ १५ तासांत पूर्ण केली आहे.

- Advertisement -

९ नोव्हेंबर २०२५ रोजी बावधन रनिंग ग्रुपतर्फे पुणे येथील खडकवासला या ठिकाणी २५ किमी, ३५ किमी, ५५ किमी, ७५ किमी आणि १०० किमी अंतराच्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

१६ तासांचा कटऑफ, १५ तासांत पूर्ण

सदर मॅरेथॉनचा ‘फ्लॅग ऑफ’ (सुरुवात) पहाटे दोन वाजता झाला. कडाक्याची थंडी, गारठा, डोंगराळ व वळणाचे रस्ते तसेच पानशेत आणि खडकवासला येथील नयनरम्य पण आव्हानात्मक निसर्गातून धावपटू आपली क्षमता पणाला लावत धावत होते. थंडी, वारा, ऊन, रात्र आणि दिवसाच्या निसर्गाच्या सर्व बाबींशी झुंजत या धावपटूंनी धाव पूर्ण केली.

- Advertisement -

१०० किलोमीटरच्या या मॅरेथॉनसाठी १६ तासांचा ‘कट ऑफ’ (Cut Off) वेळ निश्चित करण्यात आला होता. मात्र, डॉ. तुषार पाटील आणि विजय फिरके यांनी हा खडतर पल्ला केवळ १५ तासांत पूर्ण करत जबरदस्त फिटनेस आणि मनोबल दाखवून दिले. हे दोघेही आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘अल्ट्रा कॉम्रेड रनर’ पूर्ण करणारे जिल्ह्यातील नामवंत मॅरेथॉनपटू म्हणून ओळखले जातात.

इतर धावपटूंचेही योगदान

या स्पर्धेत ताप्ती रनिंग ग्रुपच्या इतर सदस्यांनीही सहभाग घेतला. एलआयसी शाखेचे व्यवस्थापक दीपक पाटील यांनी २५ किलोमीटरची आणि जितू पाटील यांनी ५५ किलोमीटरची मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ताप्ती रनिंग ग्रुपच्या सर्व चारही धावपटूंचा भुसावळ येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद शुक्ला, ॲडव्होकेट देशपांडे, तरुण बिरीया, झोपे काका यांच्यासारखे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. तुषार पाटील यांनी त्यांचे चित्तथरारक, १५ तासांचे १०० किलोमीटरच्या धावण्याचे अनुभव मनोगतातून मांडले.

Mahanagari Express | मध्य रेल्वेत खळबळ: महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज! देशविरोधी घोषणांमुळे ‘ISI’ कनेक्शनचा संशय; रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’!
Jalgaon Gold | जळगावच्या सुवर्ण बाजारात मोठी खळबळ: सोने-चांदीची पुन्हा उच्चांकाकडे वाटचाल; दरवाढीमागे ‘हे’ आहे प्रमुख कारण!
Sangli Crime | वाढदिवसाच्या स्टेजजवळच राजकीय नेत्याची ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने हत्या; शुभेच्छा दिल्या आणि…
Govinda Health | बॉलिवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती अचानक बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल!

Bhusawal Runners

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS