Bhusawal Firing | भुसावळ हादरले! सट्ट्याच्या टपरीवर रोकड लुटण्याचा प्रयत्नात एकावर गोळीबार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Bhusawal Firing | सुनिल भोळे | भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या थरारक घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. सट्ट्याच्या टपरीवर बसलेल्या ३९ वर्षीय उल्हास गणेश पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पाटील यांच्या उजव्या खांद्याजवळ गोळी लागली असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या चौघा संशयितांनी टपरीवर अचानक गोंधळ घालत रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी उल्हास पाटील यांनी विरोध केल्याने एका संशयिताने कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, तर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले.

गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत असलेल्या पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, भुसावळ शहरात अवैध धंद्याशी संबंधित व्यक्तीवर झालेला हा पहिलाच गोळीबार असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, शहर पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे तसेच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज व अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेने भुसावळमधील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांकडून पोलिस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली जात आहे.

Bhusawal Firing

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS