Karni Sena Shiv Jayanti 2026 भुसावळ |साक्षीदार न्यूज | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदूमून गेला. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला टीमच्या वतीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी महेश नगर येथील मुक्तीधाम येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित राजपूत समाजातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने वंदन केले.
प्रबोधनपर भाषणात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा अध्यक्षा सौ. सारिकाताई राजपूत यांनी समाजातील प्रत्येक स्त्रीने आई जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत घराघरात शिवरायांसारखे संस्कारक्षम नेतृत्व घडवावे, असे आवाहन केले. त्यांच्या भाषणाने उपस्थित महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या कार्यक्रमाला करणी सेनेच्या जिल्हा सचिव मीनाताई राजपूत, भुसावळ तालुका अध्यक्षा कविताताई राजपूत, श्रद्धा राजपूत, प्रमिला राजपूत, प्रतीक्षा राजपूत, उज्वला राजपूत, भाग्यश्री राजपूत, प्रियंका बोरसे, संगीता पाटील, सपना राजपूत, प्रियंका राजपूत, गायत्री राजपूत, सविता मोरे, सविता पाटील, कविता पाटील, अर्चना राजपूत तसेच असंख्य महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या उत्सवामुळे परिसरात देशभक्तीचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले.







