back to top
शनिवार, फेब्रुवारी 21, 2026

Shivaji Maharaj Jayanti 2026  | भुसावळात शिवजयंतीचा जल्लोष! श्री राष्ट्रीय राजपूत करणीसेनेतर्फे शिवगर्जना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Shivaji Maharaj Jayanti 2026  भुसावळ | साक्षीदार न्युज |  शहरात श्री राष्ट्रीय राजपूत करणीसेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिनांक 19 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात पदाधिकारी व समाजबांधवांची मोठी उपस्थिती लाभली.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर आपल्या भाषणात त्यांनी “घराघरात शिवाजी राजे घडवा” हा संदेश देत युवकांना शिवरायांचे विचार आणि पराक्रम अंगीकारण्याचे आवाहन केले.

जिल्हा अध्यक्षा सारिकाताई राजपूत यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक आईने आपल्या मुलांमध्ये शिवबा सारखे संस्कार रुजवावेत, असे प्रतिपादन केले. शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित संस्कारातूनच सक्षम समाज घडू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

- Advertisement -

यानंतर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. कार्यक्रमास जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिकाताई पाटील, जिल्हा सचिव मीनाताई राजपूत, जेष्ठ समाजसेवक दिलीपसिंग पाटील, आनंदा पाटील, सुनील पाटील, दलजीत चौधरी, प्रशांत ठाकूर, चंदूभाऊ चौहान, पवन मेहरा, भुषण राजपूत, गणेश राजपूत, वैशाली सावकारे, संध्या चौधरी, विजय राजपूत, तालुका अध्यक्षा कविता राजपूत, प्रमिला राजपूत, भाग्यश्री राजपूत, सविता राजपूत, संगीता राजपूत, प्रियंका राजपूत, सविता मोरे, अर्चना राजपूत, प्रतीक्षा राजपूत, श्रद्धा राजपूत, उज्वला राजपूत, गायत्री राजपूत, सपना राजपूत आदी समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. शिवजयंतीच्या निमित्ताने उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Shivaji Maharaj Jayanti 2026 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

RTI Penalty 25000 | माहिती न दिल्याची मोठी शिक्षा!...

RTI Penalty 25000  साक्षीदार न्यूज | माहिती अधिकार अंतर्गत मागितलेली माहिती वेळेत न दिल्यामुळे एका माहिती अधिकाऱ्याला मोठी आर्थिक शिक्षा भोगावी लागली आहे. माहिती...

Buddha Vihar Inauguration | बोराळेत नव्या बुद्ध विहाराचे लोकार्पण...

Buddha Vihar Inauguration यावल | विकी वानखेडे | बोराळे येथे बौद्ध बांधवांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर साकार झालेल्या नव्या बुद्ध विहाराचे लोकार्पण उद्या दुपारी ४.१५ वाजता...

eklavya-jayanti 2026 | भडगावात वीर एकलव्यांना मानाचा मुजरा! शिवाजी...

eklavya-jayanti 2026 भडगाव | गोरख माळी |  येथे वीर एकलव्य जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक १५...

RECENT NEWS