साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | गेल्या काही दिवसापासून राज्यातील पुणे जिल्ह्यात एनआयएन चौकशी करीत असतांना अनेक धक्कादायक कारवाई देखील केल्या आहेत. यात आता पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीये. एनआयएनच्या कारवाईत आठव्या संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे.
पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी यापूर्वी एनआयएने काही जणांना ताब्यात घेतलं होतं. महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, कटकमसंडी, हजारीबाग, झारखंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दहशतवादी संघटनेच्या कारवायांना प्रोत्साहन देत होता, अशी महिती समोर आलीये. शाहनवाझ आलम अटकेत असलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी त्याने विविध ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली होती. यासह गोळीबार आणि स्फोट करण्याबाबत आयोजित बऱ्याच प्रशिक्षण शिबिरांमध्ये तो प्रत्यक्षात सहभागी झाला होता, अशी माहिती देखील तपासात समोर आलीये.
महम्मद शाहनवाझ आलम याला पोलिसांनी साल २०२३ मध्ये देखील अटक केली होती. पुण्याच्या कोथरूड परिसरात महम्मद युनूस आणि साकी या दोन मित्रांसह शाहनवाझ दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतल्याने त्यांचा चोरीचा डाव उधळून लावला गेला. पुणे पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर तो कोंढवा परिसरातून पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पुढे महम्मद शाहनवाझ आलम इसिस दहशतवादी संघटनेचे सक्रिय असल्याचे समजलेय. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एनआयएनं त्यांच्यावर १० लाखांचे बक्षीस जाहीर केलं होतं. देशात ठिकठिकाणी बॉम्बस्फोट आणि दहशतवादी कारवाया करण्याचा त्यांचा कट होता. देशातील जनजीवन विस्कळीत करण्याचा हा कट उधळून लावण्यात यश आलं आहे.