साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांना आज हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासाठी जळगाव येथून एअर अॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी एकनाथ खडसे यांच्या छातीमध्ये अचानक दुखत होते. यानंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती मिळत आहे. आ.एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सुट्टीवर असताना तातडीने त्यांच्यासाठी अॅम्ब्युलन्सची सोय केली असल्याचं सांगण्यात येत आहे. खडसे यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात आणले जाणार आहे.