मोठी बातमी ; शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश । ३९ दुचाकी हस्तगत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; सुनिल भोळे ; – जळगाव शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चोरीच्या १९ तर जिल्हापेठ पोलिसांनी २१ दुचाकी अशा ३९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेमध्ये याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

जळगांव जिल्हयात मोटर सायकल चोरीचे गुन्हयामध्ये वाढ होत असल्याने मो.सा. चोरीचे गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी जळगांव शहरातील शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन करुन मो.सा.चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.

शहर पोलिसांनी रचला सापळा
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने जळगांव शहरातील एम.एम मास्टर तिजोरी गल्ली येथुन चोरी झालेल्या दुचाकीचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाचा तपास चालु असतांना गुप्त बातमीदारां मार्फत मिळवुन व नेत्रम येथील कर्मचारी मुबारक देशमुख यांच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पडताळणी करुन घेवुन व त्याचेकडून फुटेज प्राप्त करुन जळगांव शहरातील चित्रा चौकात जळगांव शहर पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचला.

- Advertisement -

चोरीच्या १९ दुचाकी हस्तगत
फुटेजमधील संशयित आरोपी आसिफ बशीर पटेल वय-३५ रा.दहीगांव ता.यावल यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याने त्याचे ताब्यात असलेली जिल्हापेठ पो.स्टे. येथुन चोरीस गेलेली १ मो.सा. काढुन दिली व जळगांव शहर पो.स्टे. येथे आणले असता त्याने शहर पो.स्टे हद्दीतील चोरुन नेलेल्या इतर १८ मो.सा. अशा एकुण १९ मो.सा.चोरल्याची व त्या यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे विकल्याची कबुली दिली. त्यास अटक केली असुन त्यावर आरोपीतावर यापुर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसुन जळगांव शहर पो. स्टे हद्दीत घडलेल्या १९ मो.सा. चोरीचे गुन्हे तसेच जिल्हापेठ पो.स्टे येथील २ गुन्हे उघडकीस आलेले आहे. तसेच जळगाव शहरातील इतर पो.स्टे.ला गेलेल्या इतर गुन्हयाचा उकल करीत आहोत.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकातील सपोनि रामचंद्र शिकारे, उपनिरीक्षक राजु जाधव, सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, संतोष खवले, उमेश भांडारकर, सतिश पाटील, भास्कर ठाकरे, योगेश पाटील, किशोर निकुंभ, अमोल ठाकुर, पांचाळ, प्रणय पवार अशांनी केली आहे.

 

जिल्हापेठ पोलिसांनी शोधल्या २० दुचाकी
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन रा.धानोरा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट रा.वाघळूद, अविनाश सुनील पाथरवट रा.वाघळूद, शाहरुख रमतुल्ला खाटीक रा.लक्ष्मीनगर, जळगाव सुरेश उत्तम मोरे रा.वाघळूद यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून २ रावेर येथे आहेत.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील सपोनि संतोष चव्हाण, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोना.राजेश पदमर, पोकॉ.मिलींद सोनवणे, पोकॉ.राहुल पाटील, पोकॉ.अमितकुमार मराठे, पोकॉ.प्रशांत सैदाणे, पोकॉ.नरेंद्र दिवेकर, पोकॉ.प्रविण जाधव, पोकॉ.विकास पहुरकर
अशांनी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS