साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या १५ दिवसापासून राज्यात ड्रग्स माफिया ललित पाटील याचे प्रकरण चर्चेत असतांना यात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांचं पथक मध्यरात्री नाशिकमध्ये दाखल झाले होते यावेळी ललित पाटीलच्या ड्रायव्हर सचिन वाघला घेऊन पथकाने मध्यरात्री नाशिकच्या अनेक भागात केली शोध मोहीम राबवली. तसेच नाशिकच्या देवळा मधील गीरणा नदीपात्रात सचिन वाघने ड्रग्ज फेकले होते ते सर्व जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मध्यरात्री मुंबई पोलिसांनी गिरणा नदी पात्रात सुरू केली ड्रग्सची शोध मोहीम सुरु केली होती. त्या नंतर नदीपात्रातून दोन बॅग ड्रग्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे सुमारे शंभर कोटी रुपयांचे 2 गोणी ड्रग्ज मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यासाठी प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंग करणाऱ्यांच्या मदतीने नदीपात्रात ड्रग्ज साठ्याचा घेतला शोध घेण्यात आला.
अखेर पोलिसांना हे ड्रग्स ताब्यात घेण्यात यश आले आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघ यानेच हे ड्रग्ज नदीपात्रात फेकले होते. नाशिकमधून मुंबई पोलिसांच्या टीमने पुन्हा एकदा ड्रग्सचा मोठा साठा हस्तगत केला आहे. नाशिक सटाणा रस्त्यावरील लोहनेर ठेंगोडा गावातील गिरणा नदीपात्रातून कोट्यावधी रुपयांचा ड्रग्सचा साठा पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा साठा शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या टीमने सोमवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल 3 ते 4 तास अंडर वॉटर सर्च ऑपरेशन केले. रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हरच्या मदतीने 15 फूट खोल नदीपात्रात रात्रीच्या अंधारात सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.