साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । गेल्या काही दिवसांपूर्वी वाळूच्या डंपरने कालिंका माता चौकात एका अकरा वर्षीय मुलाचा जीव घेतला होता .त्यामुळे नागरिकांकडून रास्ता रोखू देखील करण्यात आला होता . वाळू चोरी रोखण्याकरिता महसूल पाठक गेल्यावर त्यांच्यावर देखील वाळू माफियांकडून हल्ला करण्याच्या घटना देखील अनेक वेळा घडलेल्या आहेत . या वाळूचोरी मध्ये अनेक वेळा पोलिसांचा देखील सहभाग आहे असा काही सोशल मीडियावर माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी केलेल्या होत्या त्याच अनुशंघाने मागील आठवड्यातच ९ पोलिसांना पोलीस अधीक्षक डॉ माहेश्वर रेड्डी यांनी केलेल्या चौकशी दरम्यान मुख्यालयात सर्वांची बदली करण्यात आली होती .
आज महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त कार्यवाही करण्यात आली आहे आणि आता थोड्या वेळा पूर्वी मोहाडी गावाजवाळील धानोऱ्या रस्त्यालगत १ दहा चक्का , २ पिवळ्या कलरचे डंपर , १ एल पी , आणि चार ट्रॅक्टर पकडले असून पुढील कारवाही साठी ते वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात येत आहे . ह्या कारवाही करतांना पोलिसांच्या सोबत महसूल पथकाचे मंडळ अधिकारी वंजारी , मंडळ अधिकारी आंधळे ,तलाठी खणगे , तलाठी जामोदकर,चालक सुरेश महाजन आदी उपस्थित होते .