साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | राज्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय नेत्यासह उद्योजकांना जीवे ठार मारण्याची धमकी येत असतांना आता पुन्हा एकदा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना देखील जीवे मारण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळं त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून विजय वडेट्टीवार यांना फोनवरुन मेसेजच्या स्वरुपात धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर कुठलंही भाष्य करण्यास नकार दिला. पण मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. एबीपी माझानं आपल्या वृत्तात हा उल्लेख केला आहे. या पत्रामध्ये त्यांनी आपल्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी विनंती केली आहे. पण अद्याप मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या विनंतीवर काय कार्यवाही केली हे कळू शकलेलं नाही.