साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | नेपाळ येथे झालेल्या भूकंपाची घटना ताजी असतांना आज देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि एनसीआरमध्ये पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हि घटना आज दुपारी ४ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. धक्के जाणवल्यानंतर नागरिक घराबाहेर पडल्याचं दिसून आले. या भूकंपाचं केंद्रस्थान नेपाळ असून या भूकंपाची तीव्रता ५.६ रिक्टर स्केल असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी नोंदवण्यात आले आहे.
या भूकंपामुळे आतापर्यंत कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी देशाच्या राजधानीत भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता.मागील आठवड्यातदेखील नेपाळमध्ये भूकंप झाला होता. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान भूकंप येणार असल्याविषयी अचूक अंदाज लावता येत नाही तसेच किंवा कधी येऊ शकतो हे सांगता येत नाही. यामुळे भूकंप आला तर सुरक्षितस्थळी जावे. तसेच संरक्षण उपाय केले पाहिजेत.