Tehsildar vehicle hit by sand tractor साक्षीदार न्युज ; – जळगांव जिल्ह्यात वाळू चोरी हि दिवसाढवळ्या सुरु आहे . असे एकही बांधकाम नाही कि , ज्या ठिकाणी वाळूसाठा आढळत नाही . महसूल कर्मचाऱयांकडून वाळू चोरी रोखण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला जात असतोच मात्र तो कितपत असतो तेही सर्वांना माहीतच आहे . अनेक ठिकाणी हि वाळू चोरी महसूल कर्ममचाऱयांच्या जीवावर देखील बेतलेली आहे . आज सकाळी चार पाच तलाठी हे वाळू चोरी रोखण्यासाठी गस्त घालत असतांना एका वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , आज सकाळच्या सुमारास चार ते पाच तलाठी यांनी बिबा नगर या ठिकाणी वाळूने भरले ट्रॅक्टर पकडले हे वाहन जमा करण्यासाठी तलाठी यांनी तहसीलदार यांचे वाहन बोलाविले होते . या ठिकाणी तहसीलदार यांचे वाहन आल्यावर या ठिकाणहून ट्रॅक्टर जमा करण्यासाठी नेत ट्रॅक्टर चालक हे वाहन पळवून घेऊन जात असतांना ट्रॅक्टरने तहसीलदार यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली तहसीलदार यांच्या गाडीला जोरदार धडक दिली सुदैवाने हि गाडी पलटी होता होता वाचली . सुदैवाने या धडकेत कुणीही जखमी झाले नाही . हे ट्रॅक्टर जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आणले जात आहे . यात पुढे काय कार्यवाही केली जाते सविस्तर बातमी साक्षीदार न्युज वर …
Tehsildar vehicle hit by sand tractor