साक्षीदार | ४ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक मोठ्या शहरात अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच अहमदनगर औद्योगिक वसाहतीत लोखंडी पाईपलाईन बदलण्याच्या कामांची सुरक्षा ठेव व अनामत रक्कम ठेकेदाराला परत करण्यासाठी एमआयडीसीच्या सहायक अभियंत्यास तब्बल १ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. तर, धुळे एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता मात्र फरार झाला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर आणि पुण्यातील संशतियांची घरे सील केली असून, संशयित लाचखोरांकडून मोठे गबाड पथकाच्या हाती लागण्याची शक्यता आहे. विशेषत: भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता सप्ताह सुरू असतानाच मोठी कारवाई झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिक विभागाचे कौतूक केले आहे. अमित किशोर गायकवाड (३२, रा. राहुरी, जि. अहमदनगर) असे लाच स्वीकारणार्या नगर एमआयडीसीच्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. तर ठेकेदाराने केले त्यावेळीचे व सध्या धुळे एमआयडीसीत कार्यकारी अभियंता असलेला गणेश वाघ हा फरार झाला आहे. गायकवाड याच्या नगरमधील आणि फरार वाघ याच्या पुण्यातील घराची झडती सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.