Bjp
साक्षीदार | ८ऑक्टोबर २०२३ | राज्यातील एकनाथ शिंदे हे भाजप सोबत सत्तेत असल्यावर शिंदे गटाच्या एका आमदाराने फडणवीस यांच्याबद्दल विधान केल्याने या आमदाराला समज देण्यात येण्याची देखील माहिती समोर येत आहे. शिंदे गटाचे आ.संजय शिरसाठ हे नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत येत असतात आता पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याबद्दलच्या विधानाने चर्चेत आले आहे.
संजय शिरसाठ म्हणाले कि, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहावे. तसचे देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करत आहेत. त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं. कॅपेसिटीचा भाग फडणवीस यांच्याकडे आहे. म्हणून आम्हालाही वाटतं त्यांनी तेही नेतृत्व केलं पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले होते.
शिवसेना आमदार संजय शिरसाट यांना समज दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यात तर देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावे, असे वक्तव्य शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी केले होते. मात्र या वक्तव्यावरुन आता महायुतीत अंतर्गत राजकारण पाहायला मिळत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकित संजय शिरसाट यांना याबाबत समज दिली जाण्याची शक्यता आहे. पत्रकांरानी संजय शिरसाटांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर फडणवीस म्हणाले, त्यांच्या शुभेच्छा मान्य आहेत.