साक्षीदार | २५ नोव्हेबर २०२३ | राज्यातील पुणे शहरातील ड्रग्जमाफीया ललित पाटील प्रकरण आज देखील चर्चेत असतांना आता यात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्जमाफीया ललित पाटीलसह चार जणांना २९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर तपासाला सहकार्य करत नसल्यामुळे त्याचे साथीदार भूषण पाटील, अरविंद लोहार, हरीश पंत, इम्रान शेख यांना २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात काही गोष्टी समोर आल्यामुळे अधीक तपासासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ वाढवून मागीतला आहे. तपासात काही गोष्टी समोर आल्या आहेत.
ड्रग्ज फॅक्टरीमध्ये काम करत असलेल्या लोहारने कट रचला होता आणि यात अजून काही जणांचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच हरीश पंत,अरविदकुमार लोहारे,इब्राहम शेख याच्या सीडीआर मधून महत्वाची माहिती मिळाली आहे पण ते तपासाला सहकार्य करत नसल्याच पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून घेतली आहे. या तिघांचे बँक डिटेल मिळाले आहेत. तर २०२० ला इम्ब्राहम शेख हा नागपूर ड्रग्ज प्रकरणी फरार होता, याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.