साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | चोपडा शिरपूर रस्त्यावरील काजीपुरा या फाट्याजवळ दि. ५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान मोटारसायकल आणि ट्रक या वाहनात रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात झाला. यात एकजण जागीच ठार झाला असून गंभीर जखमीस धुळे येथे पुढील उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, चोपडा शिरपूर रस्त्यावर काजीपुरा फाट्याजवळ मोटार सायकल आणि ट्रक दि.५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघात झाला, प्रत्यक्ष दर्शिच्या म्हणण्यानुसार हा अपघात रस्त्यावरील खड्डे चुकवत असताना झाला, यात मोटारसायकल स्वार अजय भोई (२९) रा. सेंधवा मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला तर, सोबत असणारा, नाव माहीत नाही, हा गंभीर जखमी असून, त्यास पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत चोपडा शहर पो.स्टे. ला गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.








