साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील जळगाव- कुसुंबा या महामार्गावरील एका चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याने हर्षल शिरीष भंडारी (३९, रा. मकरंद कॉलनी) व संजय नामदेव साठे हे दोघेजण खाली पडून जखमी झाले. हा अपघात रविवार, ५ नोव्हेंबर रोजी जळगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर रेमंड चौफुलीजवळ झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रेमंड चौफुली नजीक हर्षल भंडारी व संजय साठे हे दुचाकीने जात असताना भरधाव कारने कट मारला. त्यात दुचाकी खाली पडली व त्यात दोघांना मार लागून जखमी झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी हर्षल भंडारी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पंकज पाटील करीत आहेत.