वाळूच्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगांव ; – नातेवाईकांकडे दशक्रिया विधीसाठी जात असताना वाळू वाहतूक करणाऱ्या विनाक्रमांकाच्या डंपरने दुचाकीला धडक दिल्यामुळे जळगाव तालुक्यातील जळके येथील कमलाकर मोतीराम पाटील (६४, रा. जळके, ता. जळगाव) हे जागीच ठार झाल्याची घटना रविवारी २८ जानेवारी रेाजी सकाळी ६ वाजता पळासखेडा मिराचे गावाजवळ घडला आहे. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला व काही वेळानंतर घटनास्थळावरून डंपरही पळवून नेण्यात आले.

- Advertisement -

जळगाव तालुक्यातील जळके येथील रहिवासी असलेले कमलाकर पाटील यांचे गावातच किराणा दुकान आहे. रविवारी २८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता त्यांच्या नातेवाईकांकडे दशक्रिया विधी असल्याने ते जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथे दुचाकीने (क्र. एमएच १९, डीएन ७९१४) जात होते. पळासखेडा मिराचे गावाच्या थोडे पुढे गेल्यानंतर शाळेजवळ समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या भरधाव वाळूच्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात कमलाकर पाटील हे ठार झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या वेळी जळके गावातील नागरिक व नातेवाईकांनाही अपघाताविषयी माहिती दिली.

अपघातानंतर पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ तसेच नातेवाईकांची रुग्णालयात गर्दी झाली होती. शवविच्छेदनानंतर दुपारी मयत पाटील यांच्यावर जळके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे. दरम्यान, दुसरीकडे जिल्ह्यात वाळू उपसा बंद असला तरी अनेक ठिकाणी वाळूची सर्रास वाहतूक सुरू असल्याचे अनेक घटनांवरून वारंवार समोर येत आहे. त्यात रविवारीदेखील विनाक्रमांकाच्या डंपरमधून वाळू वाहतूक सुरू असताना या वाहनाने एका जणाचा जीव घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Acident

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS