भाजप स्थापना दिनानिमित्त भाजपचे बूथ विजय अभियान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगावः येत्या ६ रोजी भारतीय जनता पार्टीचे स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीचे बूथ विजय अभियान होणार असून प्रत्येक बुथवर ३७० मते वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे सह प्रवक्ता अजित चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

- Advertisement -

याप्रसंगी प्रवक्ता लक्ष्मण सावजी , आ. राजूमामा भोळे , महानगर जिल्हाध्यक्षा सौ. उज्वलाताई बेंडाळे ,दीपक सूर्यवंशी,विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते
लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 3 एप्रील पासून सहा दिवसीय बूथ विजय अभियान राबवण्यात येणार आहे. सहा दिवसीय बूथ विजय अभियान’ अंतर्गत प्रत्येक बूथवर मागच्या निवडणुकीपेक्षा ३७० मते वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून याद्वारे महायुतीच्या उमेदवाराच्या विजयाचे मताधिक्य वाढवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे अजित चव्हाण यांनी सांगितले.

घरोघरी पत्रके पोहोचवून मतदारांशी भेट संपर्क साधणे, प्रत्येक घर व वाहनावर स्टिकर्स लावणे, नियमित संपर्कात राहणे, प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी भाजपाचा झेंडा लावणे आदी उपक्रम राबवले जातील. युवा वर्ग, महिला असे समाजातील विविध घटकासाठी ५ समूह बैठकाही घेण्यात येतील अशी माहिती अजित चव्हाण यांनी दिली, भाजपा विरोधी समजल्या जाणाऱ्या मतदारांपर्यंत मोदी सरकारचे कार्य योजना पोहोचवून भाजपाला मत देभ्यासाठी त्यांचे मन वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बूथ पासून दूर रहाणा-या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS