back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

भाजपचा जाहीरनामा पंतप्रधानांच्याहस्ते प्रसिध्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली: – भाजपचा जाहीरनामा लोकसभा निवडणुकीचा प्रसिध्द झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

- Advertisement -

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात तरुण, शेतकरी, महिला यांच्या कल्याणासाठी कार्यक्रम राबविण्याचे सांगितले आहे. मच्छीमारांसाठी विमा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आणि धान्य सुपरफूड म्हणून विकसित करण्याचं आश्वासनही देण्यात आले आहे. एकलव्य शाळा सुरू करण्याचं आश्वासनही दिलं गेले आहे. याशिवाय, एससी/एसटी आणि ओबीसींच्या कल्याणासाठी काम करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

जाहीरनाम्यात अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये रामायण उत्सव साजरा करणे, अयोध्येचा पुढील विकास, भ्रष्टाचाराविरोधात कारवाई आदी आश्वासने देण्यात आली आहेत. सत्तेत परत आल्यास देशात न्यायालयीन संहिता लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. ‘वन नेशन वन इलेक्शन’वर काम सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. रेल्वेबाबतही जाहीरनाम्यात आश्वासने देण्यात आली आहेत. त्यामुळे गाड्यांमधील प्रतीक्षा यादीची समस्या संपुष्टात येईल, असे सांगण्यात आले. याशिवाय ईशान्य भागात बुलेट ट्रेनचे काम सुरू असल्याचीही चर्चा आहे. 5G चा विस्तार आणि 6G चा विकास, ऊर्जेत स्वावलंबी होण्याचे आश्वासनही दिले आहे.

- Advertisement -

हा जाहीरनामा विकसित भारताचे चार मजबूत स्तंभ, युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब, किसान या सर्वांना सशक्त करतो. आमचा फोकस डिग्निटी ऑफ लाइ, क्वॉलिटी ऑफ लाइफ, निवेशपासून नोकरीवर आहे. यामध्ये क्वॉंटीटी ऑफ अपॉर्टुनिटी आणि क्वॉलिटी ऑफ अपॉर्चुनिटीवर भर देण्यात आला आहे.

एकीकडे अनेक इन्फ्रास्टक्चरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचं म्हटलं, दुसरीकडे स्टार्टअप आणि ग्लोबल सेंटर्सच्या माध्यमातून हाय व्हॅल्यू सर्व्हिसेसकडे लक्ष देणार आहोत. भाजपचा जाहीरनामा हा तरुण भारताच्या तरुण आकांक्षांचा प्रतिबिंब आहे. भाजप सरकारने गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरीबीत बाहेर काढून आम्ही सिद्ध केलं की आम्ही परिणाम आणण्यासाठी काम करतो.

लोकसभा निवडणुकांसाठी नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या घोषणा

मोफत रेशन योजना पुढच्या पाच वर्षांपर्यंत राहील, मोदींची गॅरंटी

आयुष्यमान भारत योजनेच्या आधारे गरिबांना ही सुविधा मिळत राहील

आता घराघरापर्यंत पाईपमार्फत स्वस्त गॅस पोहोचवणार

७० वर्षांवरील वृद्धांना आयुष्यमान भारतचा लाभ मिळेल

गरिबांचं कल्याण करणाऱ्या अनेक योजनांचा संकल्प

मुद्रा योजनेमार्फत आता २० लाखापर्यंत लोन घेता येणार

कोट्यावधी लोकांचं वीजबिल शून्य करण्याचा प्रयत्न करु

आयुष्यमान भारत योजनेत ५ लाखापर्यंत लोन मिळेल

तृतीय पंथीयांना आयुष्यमान भारत योजनेत आणणार

३ कोटी महिलांना लखपती दिदी बनवणार,

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

ACB Pollution Control Board | प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचा...

ACB Pollution Control Board | साक्षीदार न्यूज | जळगावमध्ये मोठी कारवाई करत लाच घेताना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला एसीबीने अटक केली आहे. प्रमाणपत्रासाठी...

RECENT NEWS