साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | राज्यात रविवारी २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले असून आज सोमवारी या निवडणुकीचा निकाल हाती येत आहे. त्यावर राज्यातील विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राज्यातील निवडणुकीत शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि काँग्रेसने महायुतीला जोरदार टक्कर दिली नसल्याचं दिसत आहे. परंतु या विधानाला महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विरोध दर्शवलाय. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजप हा खोटारडा पक्ष असून त्याचा चेहरा जनतेसमोर आल्याचा टोला नाना पटोले यांनी मारलाय.
राज्यात २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. यातील २ हजार २२० ग्रामपंचायतीच्या मतदानाची मोजणी करण्यात येत आहे. यात काँग्रेस पक्षाने ५८९ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. तर १३२ ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक गटाने विजय मिळला आहे. यानुसार काँग्रेसने ७२१ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवलाय, असल्याचं पटोले म्हणालेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने लढवण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ३२२ ठिकाणी विजय मिळालाय.