BJP MLA ; भाजपने विद्यमान ३० आमदारांची उमेदवार कापली तर नवख्यांना संधी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २२ ऑक्टोबर २०२३ | देशातील अनेक राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष मैदानात आहे. तर अनेक उमेदवारांनी आपली प्रमुख दावेदारी देखील केली आहे. पण जपने आज ९२ जणांची अखेरची यादी जाहीर केली. यात नव्या चेहऱ्यांना संधी देत जवळपास विद्यमान ३० आमदारांची उमेदवारी कापली आहे. यामुळे भाजपने विद्यमान आमदारांवर तलवार चालविण्याचे काम अखेरच्या यादीत केलेले दिसून येते. विशेष म्हणजे यात एकाही खासदारांचा समावेश नसून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवपुरीतून उमेदवारी दिली जाईल, हे वृत्तही अफवा ठरले.

- Advertisement -

भाजपने मध्यप्रदेशची उमेदवारांची यादी पाच टप्प्यात जाहीर केली. यात ही शेवटची यादी आमदारांसाठी अप्रिय ठरली आहे. घोषित ९१ उमेदवारांमध्ये जवळपास ३० उमेदवार हे नवे आहेत. यामुळे जवळपास एकतृतीयांश नवे चेहरे भाजपने दिले.

यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिवपुरीतून उमेदवारी दिली जाईल, असे बोलले जात होते. परंतु या मतदारसंघातून भाजपने देवेंद्रकुमार जैन यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघाचे नेतृत्व ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आत्या यशोधरा राजे शिंदे करीत होत्या. परंतु त्यांनी ही निवडणूक लढविण्यास नकार दिला. उमेदवार नाकारण्यात आलेल्यांमध्ये कैलास विजयवर्गीय यांचे सुपुत्र आकाश विजयवर्गीय यांचा समावेश आहे.

- Advertisement -

कोलारसचे आमदार महेंद्र यादव यांच्या जागी वीरेंद्र रघुवंशी यांना उमेदवारी दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना या यादीत स्थान मिळाले. काँग्रेसमधून भाजपत आलेल्या महेंद्र सिंह सिसोदिया यांना बमोरीतून भाजपने उमेदवारी दिली. अशोकनगर मतदारसंघातून जयपाल सिंह या शिंदे समर्थकाला उमेदवारी मिळाली. याशिवाय बडवाह मतदारसंघातून पूर्वाश्रमीचे काँग्रेस आमदार सचिन बिर्ला यांना रिंगणात उतरविले.

BJP MLA

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS