BJP District President Amol Javale ; शेतशिवारातील वीजतारा चोरीस आळा घालावा यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी दिले जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – गेल्या काही महिन्यांपासून रावेर आणि यावल तालुक्यातील शेतशिवारांमध्ये शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या तारांची मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकरी बांधवांना होत असलेला त्रासा बद्दल भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना वीजतारा चोरीच्या घटना थांबवण्याची पत्राद्वारे मागणी केली आहे.

- Advertisement -

चोरीच्या गुन्ह्यांमध्ये कोणतीही कारवाई झाल्याचेही दिसून येत नसल्याने चोरट्यांचे मनोबल वाढले आहे. शेतातील वीज तारांची चोरी झाल्यामुळे शेतकरी बांधवांचा वीजपुरवठा खंडित होत असुन व तो सुरळीत करण्यासाठी त्यांना अनेक बाधा येत आहे. या चोरीच्या घटनांमुळे रावेर तालुक्यातील शेतकरी बांधवांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भुरट्या चोरां विरुद्ध कारवाई करून व पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यासाठीची मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना केली आहे.

BJP District President Amol Javale

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS