BJP Foundation Day Bhusawal | “४६ वर्षांचा प्रवास, कार्यकर्त्यांना सलाम! भुसावळात भाजपा स्थापना दिनात जोरदार शक्तीप्रदर्शन”

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

BJP Foundation Day Bhusawal भुसावळ | साक्षीदार न्यूज | भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला ४६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भुसावळ शहर उत्तर मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. ६ एप्रिल) स्थापना दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराणा प्रताप चौक येथे आयोजित कार्यक्रमात केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांची आणि कल्याणकारी योजनांची आकर्षक प्रदर्शनी मांडण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात पंडित दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी राज्य परिषद सदस्य प्रमोद भाऊ सावकारे, मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे आणि भाजपा गटनेते युवराज लोणारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी नमूद केले की, “स्थापना दिन हा पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष करणाऱ्या आणि अनेक अडचणींवर मात करत संघटन उभे करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांना समर्पित आहे.” कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंद व्यक्त केला. “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” आणि “भारत माता की जय” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रवीण इखणकर, माजी प्रदेश सचिव अजय भोळे, नगरसेवक किरण कोलते यांच्यासह पुरुषोत्तम नारखेडे, बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, सतीश सपकाळे, राजेंद्र नाटकर, सुजित भोळे, चंद्रशेखर इंगळे, निळकंठ भारंबे, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, सागर चौधरी, जयंत माहुरकर, डॉ. प्रसाद बोंडे, किरण पाटील, कैलास शेलोडे, नारायण रणधीर, राहुल तायडे, ललित मराठे, अल्बर्ट तायडे, रामशंकर दुबे, रवींद्र ढगे, प्रा धीरज पाटील, शंकर शेळके, युवा मोर्चा अध्यक्ष संकल्प वाणी, नगरसेविका शोभा इंगळे, ज्येष्ठ कार्यकर्त्या अलका शेळके, शैलेजा पाटील, माधुरी चौधरी, सागर साळी, गोकुळ बाविस्कर, चेतन जैन, ऋषभ राजपूत, प्रा. विलास अवचार, प्रमोद पाटील, निलेश पाटील, चेतन बोरोले, संतोष ठोकळ, भावेश चौधरी, जितेंद्र वाघमारे, हर्षल जोशी, प्रथमेश रणधीर, गणेश जाधव, रहमान शेख आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात पक्षविस्तारासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

BJP Foundation Day Bhusawal

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

MSP Scheme | “शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन...

MSP Scheme जळगाव | साक्षीदार न्यूज | किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२५–२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली...

Sambhaji Maharaj Statue | “जळगावात मोठी मागणी! स्वामी समर्थ...

Sambhaji Maharaj Statue जळगाव | साक्षीदार न्यूज | रामेश्वर कॉलनी विकास फाऊंडेशन, मेहरूण यांच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी...

MIDC Police Bike Theft Case | “12 तासांत पोलिसांचा...

MIDC Police Bike Theft Case जळगाव | साक्षीदार न्यूज | मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात एम.आय.डी.सी. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करत चोरीची गाडी जप्त...

RECENT NEWS