भाजपचे आमदार राज्यात काढणार धनगर जागर यात्रा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ११ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील यांचा राज्यभर दौरा सुरु असतांना आता धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर जागर यात्रेचे आयोजन केले आहे.

- Advertisement -

धनगर समाज बांधवांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या यात्रेची सुरुवात १२ ऑक्टोबरपासून होईल. पडळकर यांच्या धनगर जागर यात्रेला मराठवाड्यातील येलडा येथून सुरुवात होईल. येलडा, कळंब, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सभा होतील. १२ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत २० ते २२ सभा होणार आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देश, प. महाराष्ट्र आणि कोकणात या सभा होतील.

याबाबत गोपीचंद पडळकर यांनी म्हटले की, सरकारकडून आश्वासन मिळाले आहे. पण अंमलबजावणीची आवश्यकता आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे आश्वासनावर थांबून जमणार नाही. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. पडळकर म्हणाले, २२ तारखेला कवठे महंकाळ येथील बिरोबावाडीत दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मोठ्या संख्येने लोक येतील. गोपीचंद पडळकर म्हणाले, सरकारमध्ये असलो तर माझ्यासाठी आरक्षणाची चळवळ महत्त्वाची आहे. सरकारमधील माझी कामे मी करत आहे. पण, आरक्षणाच्या लढ्यासाठी लोकांमध्ये राहणे ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. म्हणून, आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत यात्रा सुरूच राहिल. महिना दोन महिन्यात याबाबत सरकारने तोडगा काढवा, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS