Operation Sindoor साक्षीदार न्युज । उमरगा । येथे पहलगाम हिंदूवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय सैन्य ,एन एस जी आणी सुरक्षा दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत अतिरेक्यांच्या अनेक केंद्रावर मध्यरात्री हल्ला करुन ती उपद्रवी ठिकाणे उध्वस्त केली.या विजया निमित्त भाजपा उमरगा शहर मंडळाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे चौकात भव्य जल्लोष व आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यकर्ते ,पदाधिकारी व देशभक्त नागरीक मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.भव्य आतिषबाजी आणि फटाक्यांच्या गजरात वीर जवानांच्या शौर्याला मानवंदना देण्यात आली .भारत माता की जय , वंदे मातरम् च्या गगनभेदी घोषणांनी परिसर देशभक्तीने निनादून गेला होता.
या कार्यक्रमाला भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे ,उमरगा शहर मंडळाचे अध्यक्ष ॲड साईराज टाचले ,डाॅ कपिल महाजन , जेष्ठ नेते सुनिल कुलकर्णी ,संतोष वखारे ,डाॅ सचिन तावशीकर ,संदीप चौगुले ,ॲड काशीनाथ राठोड , अनिल सगर , विक्रम मस्के ,व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रसाद लड्डा ,मनीष सोनी ,जगदीश जाखोटिया ,श्रीधर ढगे ,नितीन नांगरे ,समर्थ दंडगे ,संजीव कुंभार ,संजीव विभुते ,रामदास कुलकर्णी ,यशवंत कोथींबरे , निखिल कुलकर्णी,रीयाज शेख यांच्यासह अनेक मान्यवर ,कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.कार्यक्रमाच्या समारोपात मान्यवरांनी माध्यमांशी संवाद साधत भारतीय सैन्याच्या शौर्याचे व समर्पणाचे कौतुक केले.राष्ट्ररक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याची भावना त्यांनी व्यक्त केली.हा विजय देशाच्या एकतेसाठी आणि सुरक्षेसाठी एक मैलाचा दगड ठरेल असेही त्यांनी नमूद केले.
आमदाराला २० लाखांची लाच घेताना…
जळगावात तरुणाचा क्रूर खून; चार संशयितांना…