सावदा;- सावदा येथे दि 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस साजरा करण्यात आला यावेळी सकाळी 9: 30 वा येथील गांधी चौकात सावदा शहर भाजपा तर्फे पंडीत दीनदयाल उपाध्याय व भारत मातेच्या प्रतिमा पूजन करण्यात आले
यावेळी पूजन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचे हस्ते करण्यात आले यावेळी त्यानी पक्षासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांना आज या अभिवादन करणे व त्यांचे विचार घेऊन पुढे जाणे आपले कर्तव्य असून देशहितासाठी या सर्वांनी आपले जीवन समर्पित केले असल्याचे देखील प्रतिपादन यावेळी केले, यावेळी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, बेटी बचाव च्या संयोजिका सारिका चव्हाण, मा. नगराध्यक्षा देवयानी बेंडाळे, मा. नगरसेविका रंजना भारंबे, लीना चौधरी, भाजपा शहर सरचिटणीस संतोष परदेशी, सचिन ब-हाटे, सागर चौधरी, दिपक श्रावगे, राकेश पाटील,महेश बेदरकर, सुनील पाटील, यांचे सह कार्यकर्ते उपस्थित होते,