Railway ticket Black market ; जिल्ह्यात रेल्वे तिकीटामध्ये काळाबाजार : एकाला अटक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | भुसावळ येथील रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून आरक्षणाच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक तत्कालचे तिकीट जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील जाम मोहल्ला येथील जाहिद अली इकबाल अली सय्यद (वय ३४) याला अटक करण्यात आलेल्या असून रेल्वे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार उपनिरीक्षक पि.के. दीक्षित आणि जितेंद्र कुमार मिश्रा व त्यांच्या पथकाने दक्षिण बाजूच्या रेल्वे आरक्षण कार्यालयाजवळ तपासणी केली. तिथे खिडकी क्रमांक १ जवळ १ व्यक्ती तिकीट काढून घाईघाईत जाताना त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला संशयास्पद स्थितीत पोलीस स्टेशनला आणले. तेव्हा त्याच्याकडून एक तत्कालचे तिकीट मिळून आले आहे. कमिशन मिळण्याच्या आमिषाने लोकांकडून अधिक पैसे घेऊन एजंटगिरी करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एन. के. सिंह करीत आहेत.

Railway ticket Black market

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS