back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

“लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे आशीर्वाद, कधीही विसरता येणार नाही” – गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साळवा पं. स. गणात धनुष्यबाणाला पसंती : लाडक्या बहिणींचा एकच आवाज, गुलाबभाऊ !

- Advertisement -

म्हसावद/जळगाव (सुनील भोळे) दि. 9 ; – जळगाव ग्रामीण मतदार संघात प्रचाराची धामधूम चालू असताना शिवसेनेचे नेते व मंत्री, महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचं प्रेम आणि आपुलकी फक्त जनतेपुरतंच नाही तर त्यांच्या लाडक्या बहिणींपर्यंतही पोहोचलेलं आहे. प्रचार दरम्यान गावो – गावी लाडक्या बहिणींनी एकत्र येत गुलाबभाऊंची ओवाळणी केली, गुलाबभाऊंच्या यशासाठी प्रार्थना केली. “आमचा एकच भाऊ, गुलाबभाऊ!” असं एकमुखाने म्हणत बहिणींनी त्यांना आशीर्वाद दिला. गुलाबभाऊंनी या भावनिक प्रसंगी संवाद साधताना म्हटलं, “लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद कधीही विसरणार नाही. त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे विकास कामांसाठी पाठबळ मिळणार असल्याचे जनतेशी संवाद साधतांना केले. गुलाबभाऊ पाटील यांनी साळवा पंचायत समिती गणातील नारणे, खर्दे, भामर्डी, उखळवाडी, बाभळे, गारखेडा, अनोरा, धानोरा, वंजारी खपाट येथे त्यांना प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्या-त्या गावातील महिलांनी गुलाबभाऊंची ओवाळणी करून करून त्यांचे भव्य स्वागत केले. गुलाबभाऊंची प्रचार रॅली चर्चेचा विषय असून आकर्षण ठरत आहे.

Gulabrao Patil

- Advertisement -

आजचा प्रचार दौरा
जळगाव तालुक्यातील कडगाव -स. 8, जळगाव खु. – स. 9, तिघ्रे – स. 9.30, निमगाव – स.10, बेळी – 10.30, मन्यारखेडा -11.30, तरसोद – दुपारी 4, भादली बु. – संध्या 5 वाजता.

Gulabrao Patil

यांची होती प्रमुख उपस्थिती
प्रचार रॅलीत भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, सेनेचे संजय पाटील सर, माजी जि. प. सदस्या माधुरीताई अत्तरदे, उपजिल्हाप्रमुख पी.एम. पाटील सर, रवी चव्हा सर, भाजपाचे तालुका अध्यक्ष जिजाबराव पाटील , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्यामकांत पाटील, नाटेश्र्वर पवार , सेनेचे तालुकाप्रमुख डी ओ पाटील, कल्पनाताई अहिरे, गजानन पाटील सचिन पवार, सरपंच कैलास पाटील, संतोष वाघ, सचिन कोळी, सरपंच दगा शिलावट, उपसरपंच आरून भिल, योगेश पाटील, चेतन पाटील, गोलू पाटील, नारणे सरपंच सुमनबाई मराठे, उपसरपंच आनंदा भील, विकास बाविस्कर, पूनम भील, विजय चव्हाण, रविंद्र चव्हाण, भैया मराठे सर, गोरख चव्हाण, ह. भ. प. अतुल महाराज, गोपीचंद चव्हाण, सेवा निवृत्त अधिकारी अनिल बाविस्कर, जितेंद्र मराठे, संतोष शीलावट, रमेश पाटील, स्वप्निल महाजन, नवल पाटील, एकनाथ पाटील, हेमंत महाजन, हरी महाजन, सुरेश पाटील, प्रकाश गायकवाड, अरुण महाजन, रामकृष्ण मराठे, भगवान महाजन, दिपक महाजन, आतिश महाजन, भावेश पाटील, योगेश पाटील, भास्कर पाटील, परेश पाटील, कमलाकर पाटील संदीप महाजन यांच्यासह या परिसरातील महिलांसह महायुतीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होवून ‘धनुष्यबाणाला’ प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करीत होते.

Gulabrao Patil

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS