जनमानसांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी जयश्रीताईंचा जनमतावर विश्वास 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव (सुनिल भोळे) : –  विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. महाविकास आघाडीच्या जळगाव शहर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा जोरदार रॅलीद्वारे गाठला. आज दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रचाराची रॅली शहरातील प्रभाग क्रमांक १९ मधून काढण्यात आली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

प्रभाग क्रमांक १९ मधील महिलांनी जयश्री महाजन यांचे जल्लोषात स्वागत केले. त्यांनी उघडपणे आपले मत जयश्रीताई महाजन यांनाच देण्याची तयारी व्यक्त केली. “महिला सक्षमीकरणासाठी आणि शहराच्या विकासासाठी आम्हाला विश्वास आहे की जयश्रीताईच योग्य निवड ठरतील,” असे महिलांनी सांगितले.

आपल्यावर जनतेचा विश्वास असल्याचा आणि जनतेच्या कृपादृष्टीचा उल्लेख करत जयश्री महाजन यांनी आपल्या प्रचार रॅलीत जळगावकरांना आवाहन केले. “शहराच्या अखेरच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. जळगावकरांचा आशीर्वाद मला मतपेटीतून नक्की मिळेल, याचा मला विश्वास आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महाजन यांनी त्यांच्या प्रचारामध्ये मतदारांना थेट संदेश दिला. “यावेळी त्रस्त जळगावकरांनी केवळ विकास डोळ्यासमोर ठेवून ‘मशाल’ चिन्हासमोरील बटण दाबून आपला राग मागील लोकप्रतिनिधींवर व्यक्त करावा,” असे आवाहन त्यांनी केले.

जयश्री महाजन यांच्या या प्रचार रॅलीमुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. जळगाव शहराच्या राजकीय पटावर महाविकास आघाडीचा हा प्रचार शहरवासीयांना प्रभावी ठरेल, असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून, जयश्री महाजन यांच्या या प्रचार रॅलीने जळगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS