Blood sugar
साक्षीदार न्युज ; – सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागामार्फत जेष्ठ नागरिकांसाठी रक्ताशर्करा तपासणी शिबीराचे नुकतेच प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.उदघाटन कार्यक्रमप्रसंगी आपल्याला आपल्या रक्तातील साखर किती असावी याची माहिती असायला हवी तसंच साखर हीच आजरांची जननी असल्याच मत प्राचार्य डॉ. अंजने यांनी व्यक्त केले. या शिबिराचा जवळ जवळ 49 जेष्ठ नागरिकांनी रक्तातील साखरेची तपासणी केली. रक्तातील साखर तपसनीचे काम प्रणिशास्त्र विभागातील डॉ. पी. आर. महाजन यांनी केले. याप्रसंगी संस्था अध्यक्ष श्री. भागवतभाऊ पाटील, चेअरमन श्री. श्रीराम पाटील, जेष्ठ नागरिक श्री. दत्तात्रय महाजन, विलास पाटील, रवींद्र पाटील, किशोर महाजन, श्री. आर. एस. पाटील हे प्रामुख्याने हजर होते.रासेयो चे विभागीय अधिकारी डॉ. जे. पी. नेहेते,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील. आयक्वाक चे समन्वयक डॉ.एस.एन. वैष्णव, प्रा. अंकुर पाटील,डॉ. एस. ए. पाटील, प्रा. एच. एम. बाविस्कर, डॉ. एस. एस. साळुंके, प्रा. एस. बी. महाजन,एस पी उम्रीवाड, श्रेयस, अनिकेत, हर्षल पाटील उपस्थित होते.