साक्षीदार | ५ नोव्हेबर २०२३ | देशातील आगामी काळात होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असतांना आता राजस्थानमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. नागौर जिल्ह्यातील दिडवाना येथून तिकीट न मिळाल्याने वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय माजी मंत्री युनूस खान यांनी भाजप सोडण्याची घोषणा केली आहे. वसुधरा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री युनूस खान होते.
सचिन पायलट यांच्या विरोधात त्यांनी 2018 मध्ये टोंकमधून निवडणूक लढवली होती. मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी वसुंधरा राजेंचे निकटवर्तीय माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत, युनूस खान आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना पक्षाने तिकीट दिलेले नाही. तिकीट न मिळाल्याने युनूस खान नाराज होते. राजस्थान भाजपचा मोठा मुस्लिम चेहरा युनूस खान यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस भाजपवर हल्लाबोल करू शकते. युनूस खान यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.खान यांनी आज दिडवाना येथे कार्यकर्त्यांनी बोलावलेल्या बैठकीत या दोन्ही घोषणा केल्या. युनूस खान यांच्या या घोषणेनंतर आता डिडवानामधील राजकीय समीकरण बदलू शकते. युनूस खान यांना भाजपचे तिकीट मिळण्याची शक्यता होती, मात्र असे झालेले नाही.