back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Bodwad Lift Irrigation ; वाळू वाहतुकीसाठी झाला बनावट पावती पुस्तकांचा वापर..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाळू वाहतुकीसाठी झाला बनावट पावती पुस्तकांचा वापर..
चौकशी समिती पाटबंधारे विभागातील कोणावर फोडेल खापर..

Bodwad Lift Irrigation साक्षीदार न्युज । सुनिल भोळे । जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातील सहा तालुक्यांना फायदेशीर ठरणाऱ्या बोदवड उपसा सिंचन योजनेतील विविध कामांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांची चर्चा सातत्याने होत असतानाच या प्रकल्पांतर्गत करण्यात येत असलेल्या जुनोने धरणासाठी पुरविण्यात आलेल्या रेती पुरवठ्यात अधिकारी अभियंत्यांनी बांधकाम मक्तेदारासह स्वतःचे चांगभले करून घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात अजय भागवत बढे यांनी पुराव्यानिशी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर एरंडोल प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली होती.
या चौकशी समितीला जुनोने धरणासाठी वापरण्यात आलेल्या वाळू पुरवठ्यासाठी बारकोड असलेल्या बनावट पावती पुस्तकांचा वापर झाला असल्याबद्दल अजय बढे यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याची जोरदार चर्चा असून यात बनावट पावती पुस्तकांद्वारे वाळू वाहतूक करून गैरप्रकार करणाऱ्या संबंधितांवर लवकरच गुन्हे दाखल होणार असल्याचे समजून आले आहे.

- Advertisement -

बोदवड उपसा सिंचन योजनेमुळे मुक्ताईनगर बोदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असला तरी कोट्यवधी रुपयांच्या हा प्रकल्प सोन्याची अंडी देणारी योजना असल्याचे काही चाणाक्ष व चतुर अधिकारी अभियंत्यांच्या लक्षात आले. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्णत्वास येणार असून पहिल्या टप्प्यात जुनोने धरण व दुसऱ्या टप्प्यात जामठी धरण असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

पहिल्या टप्प्यातील जुनोनी धरणाच्या बांधकामासाठी वाळूची गरज लक्षात घेऊन तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील वाळू गट बोदवड उपसा सिंचन प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यासाठी मागणी करण्यात आली होती. या मागणीप्रमाणे जिल्हा प्रशासनाने आव्हाणी येथील ७९८६ ब्रास रेतीचा गट राखीव ठेवला. या राखीव बाळू गटासाठी रुपये ४८५० प्रती ब्रास या दराने ३ कोटी रुपये बोदवड उपसा सिंचन प्रकल्प योजनेकडून भरण्यात आले. हे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सन २०१८ मध्ये तापी पाटबंधारे विभागाच्या बोदवड उपसा सिंचन योजना प्रकल्पाला वाळू वाहतूक करण्याची परवानगी दिली होती.

- Advertisement -

या प्रकल्पासाठी वाळू वाहतूक करण्यासाठी बारकोड असलेल्या १ ब्रास व २ ब्रास मर्यादेच्या वाळू वाहतूक परवाना पावती पुस्तके बोदवड उपसा सिंचन योजना प्रकल्पाला पुरविण्यात आले. मात्र, या प्रकल्पासाठी वाढू वाहतूक करताना या वाळू वाहतूक परवाना पुस्तकांतील पावत्यांसारखेच हुबेहूब असलेल्या बनावट बारकोड असलेल्या पावत्यांचा वापर झाल्याचे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत Bodwad Lift Irrigation उपसा सिंचन योजना विभागाकडून मिळालेल्या कागदपत्रांवरून समोर आले. या संदर्भात अजय भागवत बढे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिनांक 4ऑक्टोबर 2023 रोजी तक्रार करून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. मात्र या प्रकरणात सुरुवातीला डोळे झाक करणाऱ्या प्रशासनाकडे अजय बढे यांनी नेटाने तक्रारी सुरूच ठेवून बनवत होती पुस्तकात संदर्भात पुरावे सादर करण्याची तयारी दर्शवली. यादरम्यान जुने धरणासाठी पुरविण्यात आलेल्या मौजे आव्हाणी वाळू गटातील कागदपत्रे उपसा सिंचन योजना प्रकल्प विभागाकडून तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागीय पथक यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले.

कागदपत्रे हस्तांतरित झाल्यानंतर अजय भागवत बढे यांनी तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागीय पथक यांच्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी धरणगाव तालुक्यातील आव्हाणी येथील राखीव ठेवण्यात आलेल्या वाळू गटाच्या वाहतूक पावती पुस्तकांची मागणी केली. यावेळी त्यांना पुरविण्यात आलेल्या माहितीतील कागदपत्रांची अवलोकन केल्यानंतर यापूर्वी याच माहितीच्या विषयासंबंधी उपसा सिंचन योजना प्रकल्पांने पुरविलेल्या वाळू वाहतूक परवाना पावती पुस्तकांच्या प्रती व तापी खोरे सर्वेक्षण व अन्वेषण विभागीय पथक यांनी पुरविलेल्या वाळू वाहतूक परवाना पावती पुस्तकांच्या प्रती यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आली.

बोदवड उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत जुनोनी धरणासाठी आव्हाणी येथील राखीव वाळू गटातून बनावट पावती पुस्तकांचा‌ वापर झाल्याचे दिसून आल्यानंतर यात पाटबंधारे विभागातील मोठे आसामी सामील असल्याची बोलक्या चर्चेचे वास्तव उघड झाले. या प्रकरणात तापी पाटबंधारे विकास महामंडळातील अनेक बडे अधिकारी अभियंते व त्यांचा मास्टर माईंड यांच्यावर लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात असून अजय भागवत बडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी श्री. अंकुश पिनाटे यांना प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले होते.

बोदवड उपसा सिंचन योजना प्रकल्पात जुनोने धरणाच्या कामात बनावट पावती पुस्तकांचा वापर करून गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी
अपर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य चौकशी समिती नियुक्ती केली. या समितीने केलेल्या चौकशीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. बनावट पावती पुस्तकांच्या आधारे करण्यात आलेल्या वाळू तस्करीचा मास्टर माईंड हा इतर ऋतूंमध्ये राजा मानला जाणाऱ्या “वसंत” ऋतु प्रमाणे पाटबंधारे विभागातील राजा असल्याचे बोलले जात असून भगवान ” दत्तात्रय” सारखा आदर्शवादी असल्याचा दिखावा करण्यात पटाईत असल्याचे बोलले जात आहे. यात बनावट पावती पुस्तकांचे “चक्र” “धर”त त्याला “गोकुळा”चे सुदर्शन समजणारे अनेक “महा” “जन” यांचा भ्रष्ट चेहरा उगंड होवून त्याच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Bodwad Lift Irrigation

तापी पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही. डी.पाटील यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

फसवणूक प्रकरणी निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध  रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS