आसोदा रोडवरील विहिरीत आढळला बेपत्ता झालेल्या व्यक्ती मृतदेह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Pसाक्षीदार न्युज ; – जळगाव शहरातील दिनकर नगरातील ६ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता असोदा रोडजवळील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयेश प्रकाश विसपुते (वय-४२, रा. दिनकर नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

- Advertisement -

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जयेश विसपूते हे प्रौढ व्यक्ती जळगाव शहरातील दिनकर नगरात आईवडील, २ विवाहित बहिणी यांच्यासह वास्तव्याला होता. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी जयेश विसपुते हे घरात कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. त्याप्रकरणी सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध जारी होता. शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी २ वाजता असोदा रोडवरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ओळख पटवून जयेश विसपूते यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Missing Person

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS