Buddha Vihar Inauguration यावल | विकी वानखेडे | बोराळे येथे बौद्ध बांधवांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर साकार झालेल्या नव्या बुद्ध विहाराचे लोकार्पण उद्या दुपारी ४.१५ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गावात आनंद आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन बुद्ध विहाराचे लोकार्पण आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार लताताई सोनवणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले असून, गावातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
गावातील बौद्ध समाजासाठी हा बुद्ध विहार श्रद्धास्थान ठरणार असून, सामाजिक एकात्मता आणि अध्यात्मिक मूल्यांचा संदेश देणारा हा सोहळा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थांकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे.







