Shiv Jayanti Celebration Yawal यावल | विकी वानखेडे | बोराळे (ता. यावल) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत शिवगर्जना दिल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंती साजरी केली.
मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे धैर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा गौरवशाली इतिहास अधोरेखित केला. त्यांनी दिलेला स्वाभिमान, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आजच्या समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे सांगण्यात आले. तसेच तरुण पिढीने शिवरायांच्या विचारांचा आदर्श ठेवून राष्ट्रभक्ती, समाजकार्य आणि संघटनशक्ती वाढवावी, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच संध्याबाई उज्जैनसिंग राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत, उपसरपंच मायाबाई कैलाससिंग राजपूत, दिपाली चौधरी, गौतमबाई वानखेडे, भरतसिंग राजपूत, संजूसिंग राजपूत, नितीनसिंग राजपूत, अमर वानखेडे, ग्रामसेवक अनिकेत बिराडे, तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवजयंतीनिमित्त बोराळे ग्रामपंचायत परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.







