Nationalist Congress अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
Nationalist Congress जळगांव | साक्षीदार न्यूज | चमगांव तालुका धरणगाव येथील रहिवासी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष डॉक्टर नितीन वसंतराव पाटील माजी सरपंच संभाजी पाटील उर्फ भैय्या पाटील, बिलखेड्याचे माजी सरपंच बंडू दादा काटे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच श्री दिलीप भदाणे यांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जीएम फाउंडेशन येथे भाजपात प्रवेश झाला.
डॉक्टर नितीन पाटील हे धरणगाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात प्रस्त असलेले व्यक्तिमत्व आहे त्यांनी रुग्ण सेवा बरोबरच समाजसेवा ही मोठ्या प्रमाणात केली असल्याने त्यांचा दांडगा जण संपर्क आहे. डॉक्टर नितीन पाटील हे शरद पवार गटाचे पदाधिकारी असून त्यांच्या भाजपा प्रवेशाने धरणगाव तालुक्यात भाजपाला बळ मिळणार आहे. यावेळी आमदार राजू मामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पी सी पाटील,जिल्हाध्यक्ष संजय महाजन, धरणगाव मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पारधी मंडळाचे तालुकाध्यक्ष किशोर झवर, पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन सावंत, बाजार समितीचे संचालक ईश्वर चिंधु सावंत, तालुका माजी तालुका सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, युवा मोर्चाचे चंदन पाटील, विनोद पाटील, दिलीप मराठे, सोनवणे रावसाहेब, श्याम भाऊ पाटील, भगवान गणपत पाटील, राजेंद्र हरी पाटील असंख्य कार्यकर्ते या प्रवेश सोहळ्यास उपस्थित होते