काल रात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप झाला ज्यामुळे बिहार, उत्तर प्रदेश ते दिल्लीपर्यंत हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता हि रिश्टर स्केलवर 6.4 एवढी नोंदवण्यात आली आहे. भूकंपानंतर काही तासांनी नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे .नेपाळमधील जाजरकोट जिल्ह्यातील लामिडाना येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे . त्याठिकाणी सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली आहे. आतापर्यंत त्यात 73 जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुकुममध्ये २८ तर जाजरकोटमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांनी मदतकार्यासाठी लष्कर तैनात केले आहे. दैलेख, सल्याण आणि रोताल्पा जिल्ह्यातील दुर्गम गावांमधूनही घरे कोसळले आहेत . काठमांडूपासून जाजरकोट ५०० किलोमीटर अंतरावर आहे. नेपाळमध्ये सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ३ ऑक्टोबरलाही असाच प्रकार घडला होता. त्यानंतर त्याची तीव्रता 6.2 मोजली गेली. जाजरकोटमधील नागरिकांनी सांगितले कि रात्रीचे जेवण आटपून झोपण्याच्या तयारीत असतांना अचानक भूकंपाचे धक्के जाणवायला लागले .
यावेळी 2015 च्या भूकंपाची आठवण करून नेपाळ आणि बिहारमधील लोक अजूनही थरथर कापतात. त्या विध्वंसात 12000 लोक मारले गेले. दहा लाख घरे जमीनदोस्त झाली.
भूकंप का होतात?
हिमालय पर्वतरांगांना भूकंपाचा धोका आहे. यामध्ये नेपाळचाही समावेश होतो. भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्स येथे एकमेकांशी आदळत आहेत. हवामान बदलामुळे हा धोका आणखी वाढला आहे. हिमनद्या सतत वितळत आहेत. याचा परिणाम हिमालय पर्वतरांगांच्या उतारावर होतो. 2000 नंतर दरवर्षी 500 ते 600 भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. एका अंदाजानुसार 2030 पर्यंत हिमालयातील 20 टक्के हिमनद्या वितळतील. यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.