Police Murder ; ब्रेकींग : पोलीसाची निर्घृण हत्या !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरूणाचा धारदार तलवारीने वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसा कादरी दर्गा परिसरात रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी चार संशयितांना अटक करण्यात आलीय. शुभम अर्जुन आगोणे (वय-२८ रा. चाळीसगाव) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

चाळीसगाव शहरात क्रीकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. दरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्तांच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरीकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. यावेळी डॉ. देवरे यांनी मयत घोषीत केले. ही वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

चाळीसगाव शहरा खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील व सहकार्‍यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरविल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Police Murder

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS