Accident ; माजी आ.बी.एस.पाटलांच्या चारचाकीचा अपघात !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Accident

sakshidar news ; –अमळनेर तालुक्याचे माजी आ.बी.एस.पाटील यांच्या चारचाकीचा अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी सुदैवाने चारचाकी गाडीमध्ये माजी आ.पाटील हे नव्हते तर त्यांचे चालक असल्याचे समजते. हा अपघात नवलनगर जवळ दि.१० ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास झाला आहे.

- Advertisement -

Accident

 

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, धु‌ळे येथून सर्व्हिसिंग करून येत असलेल्या माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांच्या वाहनाला नवलनगर जवळ अपघात झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील नव्हते. केवळ चालक होता. तर गाडीतील दोन्ही एअर बॅगा उघडल्याने चालकही किरकोळ जखमी झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील यांची गाडी (एमएच-१२, डब्ल्यू ३२३२) ही मंगळवारी धुळे येथे सर्व्हिसींगसाठी चालक दिनेश धनगर हे घेऊन गेले होते. सायंकाळी ४.४५ वाजता गाडीची सर्व्हिसिंग करून अमळनेरकडे येत असताना नवलनगर जवळील पुलाच्या कठड्याला ही गाडी ठोकली गेली. यात सुदैवाने डॉ. बी.एस. पाटील नव्हते. तसेच गाडीच्या दोन्ही एअर बॅग उघल्याने चालक धनगरही बालंबाल बचावले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS