शेळगाव बॅरेज येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव : मासे पकडण्यासाठी गेलेल्या सागर मुरलीधर सोनवणे (वय २८, रा. असोदा रोड) या तरुणाचा पाय घसरुन तो धरणात बुडाला. ही घटना दि. २६ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज येथे घडली. ग्रामस्थांच्या मदतीने धरणातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील असोदा रोड परिसरात सागर सोनवणे हा तरुण वास्तव्यास होता. त्याच परिसरात तो मासे विक्री करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावित होता. नेहमीप्रमाणे सागर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास जळगाव तालुक्यातील शेळगाव येथे मासे पकडण्यासाठी गेला होता. दरम्यान, भिंतीवरुन पाय घसरल्याने तो धरणाच्या पाण्यात पडल्याने तो त्याठिकाणी बुडाला. ही घटना त्याठिकाणी मासे पकडण्यासाठी गेलेल्या काहीजणांच्या लक्षात आली. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, ग्रामस्थांसह मासे पकडणाऱ्यांच्या मदतीने सागरचा मृतदेह सायंकाळी उशिरा पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर तो शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सागरच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ व बहिण असा परिवार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS