साक्षीदार | २० ऑक्टोबर २०२३ राज्यातील ठाकरे गटाने आज नाशिकमध्ये ड्रग्सविरोधात विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. खासदार संजय यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांच्या बॉडीगार्डची दादागिरी समोर आली आहे.
संजय राऊत यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जात असताना एका रिक्षाचा धक्का ताफ्यातील एका वाहनाला लागला. यावेळी संतापलेल्या संजय राऊत यांच्या बॉडीगार्डने रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
ड्रग्सविरोधातील मोर्चानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गुजरातमधून ड्रग्स नाशिकपर्यंत पोहोचतं. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तुमच्या दोन मंत्र्यांनी आत्तापर्यंत या ड्रग्जच्या व्यापारातून किती खोके सरकारमधील मंत्र्यांना दिले आहेत. शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी या ड्रग्ज माफियांकडून किती पैसा तुम्हाला मिळाला हा प्रश्न आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.