back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

Burhanpur Ankleshwar State Highway ; बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य महामार्गाची खडयांमुळे दैननिय अवस्था रस्ता दुरुस्तीचे सुरू काम देखील निकृष्ट दर्जाचे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यावल ( साक्षीदार न्युज ) ; – तीन राज्यांना जोडणारा एकमेव ब-हाणपुर- अंकलेश्वर या राज्यमहामार्गावर पडलेल्या खड्यांमुळे वारंवार अपघातात मध्ये वाढ झालेली आहे. यामुळे वाहनधारकांची वाहने व हाडे खिळखिळी झाली असुन वाहनधारंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या राज्य महामार्गावर वाहनधारकांना कुठलेच वाहन व्यवस्थितपणे चालवता येत नाही अशी अवस्था झाली असुन जागो जागी फूटभर खड्डे पडलेले असुन या मुळे वाहनचालवावे तरी कसे असा प्रश्न प्रत्येक वाहन धारकांना पडत आहे.

- Advertisement -

यामुळे पूर्ण महामार्गाचे उच्चप्रतिचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेश या तीन राज्यांना जोडणारा ब-हाणपुर- अंकलेश्वर हा एकमेव राज्यमहामार्गा ची पडलेल्या खड्यामुळे दयनिय अवस्था झाली असुन.या मार्गावर पडलेल्या खडयांचे ठिक-ठिकाणी ठिगळ जोडण्याचे काम ठराविक ठिकाणी होत असते काहीवेळा तर चक्क पावसाळ्यात ही न्हाई चे अधिकारी उभे राहुन माती मिश्रीत वाळू व मुरूमच्या सहाय्याने मार्गाला ठिगळ लावण्याचे काम करतांना दिसले. याबाबत स्थानिक प्रतिनिंधीनी ही काहीसा आवाज उठवला त्याचा काही फायदा या अधिकारींवर झाला नाही. यावल च्या रोड वरील गॅस एजन्सी पासुन रस्ता दुरुस्तीचे काम सुरु झाले आहे. पण हे काम करत असताना खो-खो चा गेम खड्डे बुजवणारे खेडत आहे. १० खड्डे बुजले तर २० खड्डे सोडले जात आहे खड्ड्यांमधली आधीची माती माती बाहेर न काढता बारीक खडी व डांबर सुद्धा कमी प्रमाणात वापरत आहे.

खड्डे चांगले बुजवा माजी जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती रवींद्र पाटील हे बसले रस्त्यावर खड्ड्यात. रस्त्याने ये जा करणार्‍या नागरिक व शिक्षण माजी सभापती रवींद्र पाटील हे रस्त्याने जात असताना नागरिकांनी व त्यांनी रस्त्यावर थांबून ठेकेदाराला चांगले काम करा असा सज्जड इशारा दिला नाही तर आम्ही याच्यासाठी आंदोलन करू असा इशारा दिला आहे .

Burhanpur Ankleshwar State Highway

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS