३०० फुट दरीत कोसळली बस : ३६ प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यातील आसेर परिसरात बुधवारी बस दरीत कोसळून ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 55 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस रोडवरुन घसरुन ही बस खोल दरीत कोसळल्याची माहिती जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिली आहे.

- Advertisement -

जम्मू काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात बुधवारी सकाळी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. बाटोटे किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरुन बस ( क्रमांक JK02, CN 6555 ) ही तृंगाल आसार परिसरातून जात होती. यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस तीनशे फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात तब्बल 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धाव घेतली. अपघातस्थळावर स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली. मात्र खोल दरीत बस कोसळल्यानं बचावकार्यात अडथळे आले. तीनशे फूट खोल बस दरीत कोसळल्यानं बसमधील 36 प्रवाशांचा मृत्यू झाला असून आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia | जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूच्या डंपरने घेतला...

Sand Mafia जळगांव | सुनिल भोळे | जिल्ह्यात वाळू चोरी थांबण्याचे नाव घेत नाही .साक्षीदार न्यूजने तालुका पोलीस स्टेशनचे रामकृष्ण इंगळे यांचा वाळू चोरी...

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

RECENT NEWS