साक्षीदार | २९ ऑक्टोबर २०२३ | Buses Are Stopped Due To Maratha Reservation :- राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसापासून उपोषणाला बसले आहे तर अनेक भागात आंदोलनकर्ते बसची तोडफोड करीत असल्याने हे आंदोलन तिव्र होत चालले आहे. यात बीडमधून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची बस जाळण्यात आल्याची घटना रात्री समोर आली. यानंतर आज सकाळपासून एक देखील बस फेरी सोडण्यात आलेली नाही.
बीडमध्ये मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा पेटले आहे. आंदोलकांनी शनिवारी रात्री धुळे- सोलापूर महामार्गावर बीडच्या महालक्ष्मी चौकामध्ये टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. तर त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून आहेर वडगाव फाट्यावर बीड- कोल्हापूर ही स्लीपर एसटी बस जाळण्यात आली होती. त्याचबरोबर एका बसवर दगडफेक करत जाळण्याचा प्रयत्न देखील केला होता. यानंतर आता बीडमध्ये एसटी बस सेवा पुन्हा एकदा ठप्प झाले आहे.