Police Pistol Trap ; पिस्तुल विकण्यासाठी आले अन पोलिसाच्या सापळ्यात अडकले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक भागातून मोठ्या शहरात बेकायदेशीर असलेल्या हत्यार व पिस्तुल येण्याचे प्रमाण मोठ्या संख्येने सुरु आहे. यावर राज्यात पोलीस यंत्रणा नजर टिपून असल्याने अनेक आरोपी पोलिसांच्या ताब्यात येत आहे. पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तिघांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेने तुर्भे येथे सापळा रचून हि कारवाई केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तुर्भे येथे अग्निशस्त्र खरेदी विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्याद्वारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सोमवारी रात्री परिसरात सापळा रचला होता. यावेळी तीन चाकी टेम्पो लगत उभ्या असलेल्या तरुणांच्या हालचालीवर पथकाला संशय आला. यामुळे त्यांना ताब्यात घेतले असता अंग झडतीमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व काडतूस आढळून आले. अरविंद विष्णोई (२२), श्रवण विष्णोई (२४) व पृथ्वीराज निकम (२१) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद व श्रावण तुर्भे परिसरात राहणारे असून पृथ्वीराज कळंबोलीचा राहणारा आहे. पोलिसांच्या कारवाईवेळी पृथ्वीराज याने पोलिसांना धक्काबुक्की करून कारवाईला विरोध करून तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले.

Police Pistol Trap

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS