पिस्तुल खरेदीसाठी आला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून अनेक जिल्ह्यातून काही इसम जिल्ह्यात येवून बेकायदेशीर पिस्तुल खरेदीच्या घटना नियमित घडत असतांना आता भुसावळ बाजार पेठ पोलिसांनी पुन्हा एकदा एकावर कारवाई करीत अटक केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरातील २९ वर्षीय तरुण भुसावळ शहरात गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून साठ हजार रुपयांचे दोन गावठी पिस्तूलही जप्त करण्यात आले आहेत. तर शस्त्र विक्री करणारा भुसावळातील संशयित पसार झाला आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. यात योगेश नंदू सांगळे (२९, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सांगळे यास ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS