जागतिक सुर्यनमस्कार दिनानिमित्त सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; –  जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्तने मेहरूण तलाव परिसरातील सिध्दार्थ लॉन येथे महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या अंतर्गत ओम योगा क्लास, सन योगा गृप, माऊली योगा गृप आणि शतायू योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यामानोन शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान निशुल्क सामुहिक सुर्यनमस्कार शिबीर घेण्यात आले.

- Advertisement -

Suryanamaskar Day

 

- Advertisement -

याबबात अधिक असे की, शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक सुर्यनमस्कार दिनाच्या निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या अंतर्गत ओम योगा क्लास, सन योगा गृप, माऊली योगा गृप आणि शतायू योग सेंटर यांच्या संयुक्त विद्यामानाने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते ८.३० वाजेच्या दरम्यान महिला व पुरूष योगसाधक यांच्यासाठी सामुहिक सुर्यनमस्कार व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात ६० योगसाधक आणि १० योगशिक्षकांनी सहभाग नोंदविला.

Suryanamaskar Day

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी केले. यावेळी योगसाधक किरण दहाड, मनोज जैन, होरिलसिंह राजपूत, साधना बोंडे यांनी आपला अनभुव सांगत योगा करण्याचा सल्ला दिला. यावेळी शतायू योग सेंटरच्या योगशिक्षिका डॉ शरयू विसपुते यांच्या योगसाधकांनी रिदमिक योगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगशिक्षिका अर्चना गुरव, सुषमा सोमवंशी, चित्रा महाजन, डॉ शरयू विसपुते, साधना बोंडे, अग्रवाल मॅडम, योगशिक्षक जितेन्द्र कोतवाल, सुनिता कोतवाल आदींनी परिश्रम घेतले.

Suryanamaskar Day

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS